वेंगुर्ले (वार्ताहर)-
मासेमारी बंदीच्या कालावधीत यांत्रिक नौकांव्दारे मासेमारीस बंदी असतानाही छोट्यानौकेला आऊटबोर्ड इंजिन लावून गरकणी नामक मासेमारी करून मंगळवारी सायंकाळी समुद्रकिनारी आलेल्या निवती येथील श्याम सारंग यांच्या नौकेवर वेगुर्ले मत्स्यखात्याच्या पथकाने तब्बल सुमारे 6 तास किनारी थांबून कारवाई केली आहे. सदर नौका मालकांवर दंडात्मक कारवाईसाठी गुरूवारी मालवण येथील सहाय्यक मत्स्य आयुक्तांकडे प्रकरण सादर करण्यांत येणार आहे.दरम्यान, मिनी पर्सनली नौका मासेमारीसाठी गेल्याचे खात्रीलायक गुप्त माहिती मिळाल्याने वेंगुर्ले मत्स्य खात्याचे अंमलबजावणी अधिकारी, कर्मचारी चिन्मय जोशी, कर्मचारी व पोलीस आदी पथक हे निवती समुद्रकिनारी कारवाईसाठी थांबल्याचे पाहून आपल्या मिनी पर्सनेटवर कारवाई होईल या शक्यतेने श्याम सारंग यांनी आपली धनुर्धारीकर्ण नावाची पर्सनेट नौका मंगळवारी उशिरा रात्री दाभोली किनाऱ्यावर लावली गेली व सापडलेली मासळी मासळीची विल्हेवाट लावली. त्यामुळे श्याम सारंग यांची नौका दाभोली किनाऱ्यावर ठेवण्यात आली असल्याची माहिती बुधवारी मत्स्यखात्याला समजतात मत्स्य खात्याचे अधिकारी त्या ठिकाणी मत्स्य खात्याच्या पथकासह पोलीस घेऊन त्या नौकेच्या ठिकाणी भेट दिली असता श्याम सारंग यांची धनुर्धारीकर्ण हि नौका दाभोली किनाऱ्यावर आढळली. हि नौका येथे कधी ठेवली, कोणत्या कारणास्तव येथे आणली. याबाबतची नोटीस शाम सारंग यांना पाठवून पुरावा सहित योग्य पुराव्यासह खुलासा न केल्यास यांचेवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मत्स्य खात्याकडून देण्यात आली आहे.









