इचलकरंजी / प्रतिनिधी
Ichalkaranji Crime News : शहरालगतच्या एका गावामधील अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी तरुणाला अटक केली. त्याच्याविरोधी पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच शहरातील दोन कॅफे हाऊसच्या मालकाने संशयीत आरोपीस व पिडीत अल्पवयीन मुलीस कॅफे हाऊसमध्ये प्रति तास दराने खाजगी जागा दिल्याने, याच ठिकाणी संशयीत आरोपीने पिडीतेचा विनयभंग केला.त्यामुळे पोलिसांनी दोन कॅफे हाऊसच्या मालकांवर या गुन्ह्यात सहआरोपी करण्यात येणार आहे, अशी माहिती शहापूर पोलिसांनी दिली.









