राज्य उत्पादन शुल्कच्या इन्सुली पथकाची धडक कारवाई
मयुर चराटकर
बांदा
गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक करणाऱ्या बोलेरो टेम्पोवर राज्य उत्पादन शुल्कच्या इन्सुली पथकाने बांदा येथे कारवाई केली. सदरचा टेम्पो नवी मुंबई येथे घेऊन जात असल्याची कबुली चालकाने दिली. याप्रकरणी चालक ताब्यात असून त्याच्याकडून संबंधित विभाग माहिती घेत आहे. विधानसभा निवडणुक काळात प्रथमच ही महागडी दारू घेऊन जाणाऱ्या ( एमएच४३बीएक्स1154) टेम्पोवर कारवाई करण्यात आली. कारवाई झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी अनिल पाटील, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक मनोज शेवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांनी इन्सुली तपासणी नाका येथे भेट दिली. सदर कारवाई दुपारी 2 च्या सुमारास बांदा सटमटवाडी येथे केली. यात मुद्देमाल नेमका किती आहे ह्याची माहिती मिळाली नाही.









