कोल्हापूर :
सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे स्वागत करतेवेळी पोलिसांनी ब्रेथ अॅनालायझर मशीनने केलेल्या तपासणीमध्ये 316 मद्यपी वाहन चालक आढळून आले. त्याच्याविरोधी मद्य प्राशन कऊन वाहन चालविणे, स्वत:सह इतरांच्या जीविताला धोका पोहचविणे, वाहतुकीच्या नियमाचे उल्लघंन केल्याप्रकरणी कारवाई केल्याचे गुन्हे जिह्यातील विविध पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागता वेळी सार्वजनिक ठिकाणी रस्ता वाहतुकीच्या नियमाचे उल्लघंन कऊन, हुल्लडबाज करणाऱ्या वाहनधारक, दाऊ पिऊन वाहन चालविणारे, उघड्यावर दाऊ पित बसणे आदीच्या विरोधी कारवाई करण्याचे जिह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सक्त आदेश दिले होते. त्यानुसार पोलिसांनी जिह्यात वेगवेगळ्या 50 ठिकाणी नाकाबंदी करुन, ब्रेथ अॅनालायजर मशीनने तपासणी करीत, मद्य प्राशन कऊन वाहन चालविणाऱ्या दुचाकी, चारचाकी, अवजड वाहनाच्या चालकाची तपासणी केली जात होती. यावेळी 316 इतके मद्य प्राशन करुन वाहन चालवित असल्याचे आढळून आले. त्याविरोधी मद्य प्राशन कऊन वाहन चालविणे, स्वत:सह इतरांच्या जीविताला धोका पोहचविणे, वाहतुकीच्या नियमाचे उल्लघंन केल्याप्रकरणी कारवाई केली आहे.
मद्यपीकडून शांतता भंग
नववर्षाच्या स्वागतादरम्यान पोलिसांना सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन कऊन, शांतता भंग करणारे 5 तरुण आढळून आले. त्या मद्यपी तरुणाविरोधी गुन्हे दाखल केले आहे.
उल्लंघनाचा प्रकार कारवाई
दाऊ पिऊन वाहन चालविणे 316
ट्रिपल सीट वाहन चालविणे 237
वाहनांना नंबर प्लेट नसणे 32
वन वे कारवाई 21
विना सिट बेल्ट वाहन चालविणे 2
सिग्नल जंप करणे 4
जादा प्रवासी बसवून वाहतुक करणे 9
लायसन्स संबंधी कारवाई 131
उघड्यावर दाऊ पिणे 5
इतर कारवाई 538
बी.पी. अॅक्ट केसेस 20
एकूण केसेस 1 हजार 328
786 पोलिसांचा बंदोबस्त
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नववर्षाच्या स्वागतासाठी जिह्यातील विविध ठिकाणी नागरीक एकत्रीत आले होते. त्याच्या सुरक्षितेसाठी 6 पोलीस उपअधीक्षक, 80 पोलीस अधिकारी व 700 पोलीस कर्मचारी असा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मंगळवारी मध्यरात्री पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित स्वत: रस्त्यावर उतऊन, पोलीस बंदोबस्ताची पाहणी करीत होते.








