राज्य उत्पादन शुल्क, तपासणी नाका इन्सुली पथकाने केली कारवाई
प्रतिनिधी
बांदा
गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक करणाऱ्या मालवाहू बोलेरो पीकअप गाडी वर राज्य उत्पादन शुल्क, तपासणी नाका इन्सुली पथकाने कारवाई केली. या कारवाईत 17 लाख 49 हजार 220 किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. तर याप्रकरणीआंबादास पोपट आहिरे ऊर्फ आंबादासभाई पोपटभाई आहिरे, वय 40 वर्षे, रा. 687, दहिवड, ता. देवळा, जि. नाशिक यास ताब्यात घेतले. सदरची कारवाई बांदा-वाफोली रोड, डोंगरीकर हॉटेलजवळ केली. गोव्याहून कोल्हापूर च्या दिशेने जाणाऱ्या बोलेरो पीक अप मधून (एमएच-48-सीबी-3259) प्लॅस्टिकचे कॅरेट व खराब नारळाचे शहाळ्यांखाली गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचे 150 बॉक्स व बिअरचे 08 बॉक्स आढळून आले. सदरची कारवाई मा. श्री. वैभव वैद्य, साहेब, प्र. अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सिंधुदुर्ग यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली संजय मोहिते, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, तपासणी नाका इन्सुली,अमित पाडळकर, निरीक्षक, रा.उ.शु. कुडाळ, तानाजी पाटील, प्रदीप रास्कर दुय्यम निरीक्षक, गोपाळ राणे, स.दु. नि, प्रसाद माळी जवान, रणजीत शिंदे, जवान नि. वाहन चालक यांनी केली. सदर प्रकरणी पुढील तपास निरीक्षक, तपासणी नाका इन्सुली श्री. संजय मोहिते करीत आहेत.









