तांबोळी येथील युवकावर गुन्हा दाखल
प्रतिनिधी
बांदा
गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक करणाऱ्या इनोव्हा गाडीवर राज्य उत्पादन शुल्क च्या विभागाने बांदा येथे कारवाई केली. या कारवाईत ६लाख ३० हजार रुपयाची दारू व १० लाख किमतीची गाडी असा एकूण १६लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला तर गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक केल्याप्रकरणी रविराज अंबाजी सावंत( वय ३१ वर्षे. रा. तांबोळी, खालचीवाडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सिंधुदुर्ग भरारी पथकाने केली.”
गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती त्यानुसार बांदा नजीक गोवा हद्दीत सिंधुदुर्ग भरारी पथक ठाण मांडून होते .शुक्रवारी २१ रोजी जुन्या पत्रादेवी मार्गावर तपासणी करत असताना गोव्याहून बांदाच्या दिशेने येणारी इनोव्हा ( एम.एच.०५/ ए.जे. ८५५०) येताना दिसली. गाडीची तपासणी केली असता गाडीत पाठीमागील सीटवर व डिक्कीमध्ये गोवा बनावटी दारुचे विविध ब्रॅन्डचे एकुण १०५ बॉक्स असल्याचे निदर्शनास आले. यावेळी चालकासह मुद्देमाल ताब्यात घेतला .१६लाख ३०हजार एवढा रकमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाईमध्ये अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सिंधुदुर्ग सौ. स्नेहलता नरवणे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली शरद जाधव निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक सिंधुदुर्ग दुय्यम निरीक्षक सत्यवान भगत, दुय्यम निरीक्षक विशाल सरवटे, जवान देवेंद्र पाटील, जवान जगन चव्हाण यांनी सहभागघेतला. पुढील तपासकाम दुय्यम निरीक्षक सत्यवान भगत हे करत आहेत.









