उत्तर कर्नाटकातील तीन संशयितांना अटक
पणजी : आल्त पर्वरी येथील बंगल्यात बेकायदा सुऊ असलेल्या सट्टेबाजी प्रकरणावर पर्वरी पोलिसांनी कारवाई करून तीन संशयितांना अटक केली आहे. त्यांच्याकडून मोबाईल फोन, लॅपटॉप, वायफाय राऊटर व इतर साहित्यासह सुमारे एक लाख ऊपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. संशयितांच्या विरोधात गोवा, दमण व दीव सार्वजनिक जुगार कायद्याच्या कलम 3 आणि 4 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या संशयितांमध्ये शंकर एन. (वय 46), रूपेश पी. (वय 34), आर. कुमार (वय 32) यांचा समावेश असून सर्व उत्तर कर्नाटक भागातील आहेत. बुधवारी रात्री पर्वरी येथील एका बंगल्यात भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील विश्वचषक सामन्यावर बेकायदेशीर क्रिकेट सट्टा सुऊ असल्याची माहिती पर्वरी पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी त्वरित कारवाई केली व संशयितांना अटक केली. ही कारवाई पर्वरी पोलीस स्थानकाचे निरीक्षक राहुल परब, उपनिरीक्षक सीताराम मळीक, हवालदार उत्कर्ष देसाई, महादेव नाईक, सिद्धेश नाईक, योगेश शिंदे आणि नितेश गौडे यांनी केली असून एसडीपीओ पर्वरी यांच्या देखरेखीखाली पुढील तपास सुरू आहे.









