खारेपाटण येथील चालक ताब्यात
मयुर चराटकर
बांदा
गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक करणाऱ्या बलेनो कारवर गुरूवारी रात्री उत्पादन शुल्क विभागाच्या इन्सुली पथकाने मळेवाड येथे कारवाई केली.या कारवाईत २ लाख २४ हजार रुपयांची दारू व ८लाख किंमतीचा बलेनो कारवरअसा एकूण १०लाख २४ हजार किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला तर बेकायदा दारू वाहतूक केल्या प्रकरणी प्रदीप विश्वनाथ निग्रे (वय ५८ रा खारेपाटण )यास ताब्यात घेतले.सदर कारवाई गुरुवारी रात्री साडे आठच्या सुमारास केली. ही कारवाई दुय्यम निरीक्षक तानाजी पाटील ,प्रदीप रासकर, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गोपाळ राणे, जवान दीपक वायदंडे, प्रसाद माळी, रणजित शिंदे, यांनी केली.









