ट्रम्प स्टाईल’ कारवाई , 600 हून अधिक जणांना अटक
वृत्तसंस्था/ लंडन
अमेरिकेनंतर आता लेबर सरकारने ब्रिटनमध्ये बेकायदेशीर स्थलांतरितांविरुद्ध मोठी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत त्यांनी लहान दुकाने आणि भारतीय रेस्टॉरंट्सना लक्ष्य केले आहे. लेबर सरकारने बेकायदेशीर स्थलांतरितांवर ट्रम्प स्टाईलने कारवाई सुरू केली आहे. या कारवाईदरम्यान सरकारने देशभरातील 828 ठिकाणी छापे टाकले आहेत. या मोहिमेअंतर्गत 609 हून अधिक स्थलांतरितांना अटक करण्यात आली आहे. नेल बार, भारतीय रेस्टॉरंट्स, कार वॉश आणि किराणा दुकानांमध्ये ही कारवाई केल्याचे समजते. ब्रिटिश गृहमंत्री यवेट कूपर स्वत: या मोहिमेवर लक्ष ठेवत आहेत.









