मुंबई
पोलाद उत्पादन क्षेत्रातील दिग्गज कंपनी टाटा स्टीलने रोहीत फेरो टेक या कंपनीचे संपूर्णपणे अधिग्रहण केले आहे. अलिकडेच कंपनीने रोहीतमधला 10 टक्के वाटा 20 कोटी रुपयांना खरेदी केला आहे. रोहीत फेरोही खाण क्षेत्रातील कंपनी असून टाटा स्टीलची सहकारी कंपनी टाटा स्टील मायनिंग लि. यांनी यापूर्वी रोहीतमध्ये 90 टक्के इतका वाटा प्राप्त केला होता. समभाग व इतर माध्यमातून कंपनीने गुंतवणुकीचे नियोजन केले आहे.









