लंडन / वृत्तसंस्था
जेकब रॅमसेने क्लबशी नवा करार केला असल्याची घोषणा ऍस्टॉन व्हिलाने केली. 20 वर्षीय जेकब रॅमसे आता 2027 पर्यंत या क्लबचे प्रतिनिधीत्व करेल. ऍस्टॉन व्हिला अकादमीचे प्रोडक्ट असलेल्या या खेळाडूने 2019 मध्ये वेस्ट ब्रॉमिच ऍल्बियनविरुद्ध वरिष्ठ स्तरीय पदार्पण केले. मिडफिल्डर जेकब विविध स्तरावरुन या संघातूनच खेळत आला आहे. या हंगामात व्हिलातर्फे तो मिडफिल्डमध्ये खेळेल. त्याने ऑक्टोबरमध्ये अर्सेनलमध्ये क्लबतर्फे पहिला गोल केला आणि त्यानंतर हंगामात आणखी 5 गोलची भर घातली.









