जिल्हा पोलीस दलात ३६ वर्षे बजावली सेवा
ओटवणे । प्रतिनिधी
तळवडे पलिकडची खेरवाडी येथील रहिवासी तथा निवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक अच्युत एकनाथ परब (६२) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांनी ३६ वर्षे जिल्ह्याच्या पोलीस दलात उल्लेखनीय सेवा बजावली. गावच्या सामाजिक क्षेत्रातही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली, जावई, भाऊ, बहीणी, पुतणे असा मोठा परिवार आहे.









