आचरा । प्रतिनिधी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आचरातर्फे बुधवार 6 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता आचरा तिठा येथे नारळ लढवणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी प्रथम क्रमांक ५ हजार रुपये व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक ३ हजार रुपये व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. प्रथम येणाऱ्या 70 स्पर्धकांना यात सहभाग घेता येणार आहे . या स्पर्धेसाठी 5 नारळ मंडळाकडून देण्यात येणार आहेत . या कार्यक्रमाचे औचित्य साधून माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते आचरा रिक्षा संघटना अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच आचरा पोलीस स्टेशन होमगार्ड कर्मचारी यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. अधिक माहिती साठी संपर्क रूपम टेमकर 9168107010 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आचरा विभाग संघटक माजी सरपंच मंगेश टेमकर, विभागप्रमुख समीर लब्दे तसेच केदार परुळेकर यांनी केले आहे.









