Achra Gram Panchayat felicitates college students participating in Rajpath
विद्यार्थ्यांना आचरा ग्रामपंचायत कडून आर्थिक मदतीचाही हाथ
26 जानेवारी रोजी गनराज्यदिनी राजपथावरील कार्यक्रमासाठी आचरा कॉलेजच्या विद्यार्थ्यांची निवड झाली असून आज आचरा ग्रामपंचायतच्या वतीने या विदयार्थ्यांना शाल व फोफळीची रोपे देऊन सन्मानित करण्यात आले. येणाऱ्या प्रवास खर्चासाठी आचरा ग्रामपंचायत कडून आर्थिक मदतही यावेळी करण्यात आली.
यावेळी मालवण तालुका पत्रकार संघाचा उत्कृष्ट पत्रकार हा पुरस्कार प्राप्त झालेले आचरा गावाचे सुपुत्र परेश सावंत यांचाही यावेळी सत्कार आचरा ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आला. यावेळी सरपंच प्रणया टेमकर, उपसरपंच पांडुरंग वायंगणकर, ग्रामविस्तार अधिकारी पी जी कदम, सदस्य बबलू गावकर, रेश्मा कांबळी, अनुष्का गावकर, राजेंद्र परब, ममता मिराशी, दिव्या आचरेकर, वैशाली कदम, डॉ प्रमोद कोळंबकर, जयप्रकाश परुळेकर, अभय भोसले, शाम घाडी, चंदन पांगे, अशोक कांबळी व अन्य मान्यवर उपस्थित होते
आचरा / प्रतिनिधी









