आचरा प्रतिनिधी
धी आचरा पीपल्स असोसिएशन संचलित माध्यमिक शालांत परीक्षेत नामदेव शंकर कावले इंग्लिश मिडियम स्कुल आचरा चा निकाल १००%लागला आहे असून या प्रशालेतून 35 विद्यार्थी परीक्षेत बसले होते ते सर्वजण उत्तीर्ण झाले असून १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. या विद्यार्थ्यांमध्ये विशेष नाविन्यपूर्ण यश मिळविलेले विद्यार्थी : प्रथम क्रमांक दिनेश प्रफुल्ल माळगावकर -92.00 टक्के, द्वितीय क्रमांक मिताली संजय माळकर – 91.80 टक्के, तृतीय क्रमांक मधुरा नरेश मसुरकर 90.80टक्के या विध्यार्थ्यानी प्राप्त केलेत या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ प्रदिप मिराशी, कार्याध्यक्ष प्रदिप परब- मिराशी, स्थानिक स्कूल कमेटी अध्यक्ष निलेश सरजोशी,खजिनदार परेश सावंत, सदस्य मंदार सांबारी, सुरेश गांवकर, दिलीप कावले, मुख्याध्यापिका मायलीन फर्नांडिस यांनी अभिनंदन केले आहे.
Previous Articleधुण्याच्या चावीच्या संवर्धनास सुरुवात
Next Article आरोस विद्या विकास हायस्कूलमधून रुचिरा मुरकर प्रथम









