Achra beach cleaning campaign
आचरा ग्रामपंचायतकडून स्वच्छता मोहिमेचे आयोजन
स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून २७ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व समुद्र किनारे स्वच्छ करण्याकरिता समुद्र किनारा स्वच्छता कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आचरा ग्रामपंचायत तर्फे आचरा किनारा समुद्र किनारी सागर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. स्वच्छता मोहिमेत कचरा मोठया प्रमाणात एकत्रित गोळा करण्यात आला या मोहिमेत स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, नागरिक स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्यासाठी उपस्थित होते. या मोहिमेत सरपंच प्रणया टेमकर, ग्रामविस्तार अधिकारी पी जी कदम, पोलीस पाटिल जगन्नाथ जोशी,यशराज प्रेरणाचे मंदार सरजोशी व सदस्य, नोडलं अधिकारी राजेंद्र कांबळे, ग्रामपंचायत कर्मचारी नरेश परब, रुपेश परब, गिरीधर आपकर, आचरा विभागातील शिक्षण वर्ग, आरोग्य विभाग कर्मचारी, विध्यार्थी वर्ग व ग्रामस्थ सहभागी झाले होते.
आचरा / प्रतिनिधी









