शर्वरीची राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड
वार्ताहर/उचगाव
कल्लेहोळ येथील प्राथमिक मराठी शाळेच्या खेळाडूंनी केंद्रपातळी, तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय तसेच विभागीय स्पर्धेत भाग घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे. यामध्ये शर्वरी राजाराम पाटील हिची राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे. प्रथमेश पुन्नाप्पा कित्तूरची विभागीय योगा स्पर्धेसाठी, मिताली परशराम खन्नुकरची विभागीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली. सदर खेळाडूंना मुख्याध्यापक बी. व्ही. पाटील व क्रीडा शिक्षिका अर्चना सरदेसाई यांचे व इतर सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. एसडीएमसी कमिटीचे अध्यक्ष आणि सर्व सदस्य तसेच पालक व क्रीडाप्रेमी नागरिक, माजी विद्यार्थी संघटना इत्यादींचे प्रोत्साहन लाभत आहे.









