मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती
मडगाव : मडगाव शहराचा विकास गेली काही वर्षे रखडला होता. मात्र पुढील चार वर्षांत या मतदारसंघाला ‘अच्छे दिन’ येतील, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल मंगळवारी रावणफोंड येथील सहा पदरी उ•ाणपूल तसेच रावणफोंड ते खारेबांदपर्यंतच्या रस्त्याचे सुशोभिकरण या दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी भाजपमध्ये का प्रवेश केला असा प्रश्न अनेकांना पडला असेल. पण, गोव्याच्या विकासाबरोबरच मडगावचा विकास व्हायला पाहिजे या हेतूने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे आपले सरकार सक्षम बनले व आज आपण झपाट्याने विकास प्रकल्प पुढे नेऊ शकलो, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
रखडलेले प्रकल्प मार्गी लागणार
गेली अनेक वर्षे रखडलेला मडगावचा बसस्थानक प्रकल्प, नव्या जिल्हा इस्पितळाचा दर्जा उंचावणे व त्या ठिकाणी नवीन मेडिकल कॉलेज सुरू करणे तसेच रेल्वे उ•ाणपूल, सोनसडा कचरा प्रकल्प हे महत्त्वाचे प्रकल्प आगामी काळात मार्गी लागणार आहेत. नगरसेवकांनी मडगाव शहर स्वच्छ व नीटनेटके राहणार याची जबाबदारी घेतली पाहिजे. मडगाव शहराला नवी झळाली देण्यासाठी सरकार सर्व ते सहकार्य करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
गोव्यात तीस हजार कोटींची विकासकामे
गेल्या 9 वर्षांच्या काळात पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या नेतृत्वाखाली 30 हजार कोटी ऊपयांपेक्षा जास्त विकासकामे गोव्यात मार्गी लागली आहेत. त्यात मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ, आयुष्य हॉस्पिटल, मांडवीवरील तिसरा पूल, जुवारीवरील दुसरा पूल, मनोहर पर्रीकर बायपास रस्ता काणकोण, वास्कोतील सीलिंक, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पर्यटन क्षेत्रातील प्रकल्प इत्यादांचा समावेश आहे. गोव्यात गेल्या 50 वर्षांत जेवढी विकासकामे झाली नव्हती, तेवढी विकासकामे दहा वर्षांत पूर्ण केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
… त्याला आपण काही करू शकत नाही : कामत
मडगाव मतदारसंघात विकासाचे अनेक प्रकल्प पूर्ण झाले आहेत. अनेक विकासकामे मार्गी लागत आहेत. या पार्श्वभूमीवर काहीजण भिंग घेऊन फिरतात व काहीच झाले नसल्याचा शोध लावतात व वृत्तपत्रांना बातम्या देतात. अशा घटकांना आपण काही करू शकत नाही, असे कामत म्हणाले.
… अशा बातम्यांना महत्त्व देणार नाही
जोपर्यंत मडगावकरांचा पाठिंबा दिगंबर कामत व भाजपला आहे तोपर्यंत अशा कितीही बातम्या प्रसिद्ध झाल्या तरी त्याला महत्त्व देणार नाही. मडगावकरांना विकास दिसतो, लोकांना रावणफोंड येथे सहा पदरी उ•ाणपूल हवा होता तो आम्ही पूर्ण करणार आहोत, मडगावचे रेल्वे गेट आगामी काळात बंद केला जाणार आहे. त्या ठिकाणी रेल्वे उ•ाणपूल बांधण्यात येईल. या उ•ाणपूलासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आश्वासन दिले आहे. जेव्हा हे काम पूर्ण होईल, तेव्हा येथील वाहतूक समस्या निकालात निघणार असल्याचे आमदार दिगंबर कामत यावेळी बोलताना म्हणाले.
कोकण रेल्वेचे पूर्ण सहकार्य
रावणफोंड येथे सहापदरी उ•ाणपूल उभारण्यासाठी कोकण रेल्वेने पूर्ण पाठिंबा दिला असून त्यांच्या सहकार्यानेच या पुलाचे काम मार्गी लागत असल्याचे यावेळी कामत म्हणाले. सध्याच्या रावणफोंड पुलावर वाहनांची कोंडी होत आहे. या पुलावरून जलवाहिन्या तसेच अनेक केबल नेण्यात आलेल्या आहेत. मात्र, सहा पदरी उ•ाणपुलाचे काम पूर्ण झाल्यावर पुढील शंभर वर्षे कोणतीच समस्या निर्माण होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. मडगावचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता, गोवा साधन सुविधा विकास महामंडळाचे हडकोणकर यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाला समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर, अनिवासी भारतीय आयुक्त अॅड. नरेंद्र सावईकर, भाजपचे सरचिटणीस दामू नाईक यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. उ•ाणपुलावर सुमारे 70 कोटी ऊपये तर रस्ता सुशोभिकरणावर सुमारे 14 कोटी ऊपये खर्च केले जाणार आहेत.









