इचलकरंजी ,प्रतिनिधी
आचार्य श्री 108 बाहुबली मुनी महाराज यांच्या परम शिष्या प.पु.105 गणनी आर्यिका श्रुतदेवी माताजी(वय ६१) यांचे गुडगाव नवी दिल्ली येथे सल्लेखनापूर्वक समाधी मरण झाले आहे. सोमवारी सायंकाळी गुडगाव येथे त्यांच्यावर विधिपूर्वक अंत्यसंस्कार करण्यात आले.
आर्यिका श्रुतदेवी माताजी यांचे पूर्वाश्रमीचे नाव सुरेखा धनपाल पाटील असे होते. त्यांची कर्मभूमी शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड तर जन्म ठिकाण बोरगाव (तालुका चिकोडी ) हे होते. दहावीपर्यंतचे शिक्षण त्यांचे कुरुंदवाड या गावी झाले. त्यानंतर त्यांनी आचार्यरत्न श्री देशभूषण मुनी महाराज यांच्याकडून ब्रह्मचर्य व्रत घेतले होते. सन 1984 मध्ये आचार्य श्री 108 बाहुबली मुनी महाराज यांच्याकडून त्यांनी दीक्षा घेतली. आचार्य रत्न श्री बाहुबली मुनी महाराज यांच्या संघातून त्यांनी भारतभर विहार करून धर्मप्रचार व प्रसार केला.
गेली काही वर्षे त्यांचे वास्तव्य गुडगाव नवी दिल्ली या ठिकाणी होते. सोमवारी दुपारी एक वाजता त्यांचे सल्लेखनापूर्वक समाधी मरण झाले. नवी दिल्ली येथील जैन समाजाच्या वतीने त्यांच्यावर विधिपूर्वक अंत्यसंस्कार करण्यात आला. रक्षा विसर्जन मंगळवारी सकाळी गुडगाव नवी दिल्ली या ठिकाणी आहे.









