हिंदुत्ववादी कार्यकर्ते व श्री रामसेनेचे जिल्हाध्यक्ष रवी कोकितकर यांच्यावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेचा १८ तासाच्या आत पर्दाफाश करण्यात बेळगाव पोलिसांना यश आला आहे.
वैयक्तिक द्वेष आणि आर्थिक व्यवहारातून गोळीबार झाल्याचे कारण समोर आले आहे. या प्रकरणी बेळगाव पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.शनिवारी सायंकाळी झालेल्या गोळीबाराच्या घटनेने पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगया यांनी केवळ चार तासात विशेष पथकाची स्थापना करत या प्रकरणी तिघांना अटक केल्याच्या माहिती रविवारी दुपारी पत्रकार परिषदेत दिली. अभिजित सोमनाथ भातकांडे ( वय ४१, पाटीलमळा, बेळगाव ), यांच्यासह राहुल निगंन्नी कोडचवाडकर (वय ३२ रा. संभाजी गल्ली, बस्तवाड ), जोतिबा गंगाराम मुतकेकर (वय २५, रा. संभाजी गल्ली, बस्तवाड, हलगा ), अशी आरोप केलेल्या आरोपींची नावे आहेत.शनिवारी सायंकाळी हिंडलगा जवळ कॅम्प पोलीस स्थानकाच्या हद्दीत रवी कोकितकर यांच्यावर गोळीबार झाला होता. उपचारासाठी त्यांना खासजी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. वैयक्तिक द्वेषातून ही घटना झाली आहे. अभिजित भातकांडे आणि रवी कोकितकर यांच्यात पूर्व वैमनस्य होते. काळ झालेल्या गोळीबाराला पूर्व वैमस्य असल्याचे समोर आले आहे.
Previous ArticleKolhapur : रांगोळीत मोटर सायकलींची समोरासमोर धडक; एक जागीच ठार
Next Article सहा दिवस बेपत्ता शिक्षक अखेर पोलिसात हजर









