प्रसिध्द पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला (Sidhu Musewala) याच्या हत्येशी संबंधीत दोन आरोपींची तुरंगात झालेल्या गॅंगवॉरमध्ये हत्या झाली असून यामुळे पंजाब पोलीसात खळबळ माजली आहे.
पंजाबमधील गोइंदवाल मध्यवर्ती कारागृहामध्ये असलेल्या सिद्धू मूसेवाला खून प्रकरणातील आरोपी तुरुंगाच्या आवारातच एकमेकांना भिडले. तुरुंगात झालेल्या मारहाणीत दोन कैद्यांचा मृत्यू झाला असून बटाला येथील मनदीप सिंग उर्फ तुफान आणि बुधलाना येथील मनमोहन सिंग उर्फ मोहना अशी मृतांची नावे आहेत. भटिंडा गावचा केशव नावाचा आणखी एक कैदी जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे तिघेही सिद्धू मूसवाला हत्याकांडात आरोपी आहेत.
पंजाबी गायक आणि रॅपर सिद्धू मूसवाला याची 29 मे 2022 रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. पॉईंट-ब्लँक रेंजवर गोळी झाडल्यामुळे त्याचा जाग्यावरच मृत्यु झाला होता. हल्लेखोरांनी मूसवालावर 30 हून अधिक राऊंड गोळीबार केला होता. या हाय प्रोफाईल खून प्रकरणच्या तपासात लॉरेन्स बिश्नोई हा मास्टरमाईंड असल्याचे पुढे आले. कॅनडामध्ये असलेला त्याचा जवळचा सहकारी गोल्डी ब्रारचाही या प्रकरणात चौकशी सुरू होती.
Previous Articleऊसतोडणी यंत्राने अचानक घेतला पेट; 30 लाखाचे नुकसान
Next Article सेलेनाचा सोशल मीडियावर विक्रम









