कुरुंदवाड : प्रतिनिधी
पत्नीला त्रास दिल्याचा राग मनात धरून सावकार कल्लाप्पा देबाजे (रा. मजरेवाडी, ता. शिरोळ) याचा खून केल्याची कबुली संशयित आरोपी माळाप्पा हेग्गण्णावार(रा. नागराळे, ता. चिक्कोडी, जि. बेळगाव) याने दिली, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, माळाप्पा हेग्गण्णावार देव सांगण्याचे काम करत होता. मयत सावकर देबाजे हा त्याच्याकडे होत असलेल्या त्रासाबद्दल विचारणा करण्यासाठी जात होता. दरम्यान हेग्गण्णावार याच्या पत्नीकडे वाईट नजरेने पाहून शरीरसुखाची मागणी करून त्रास देत असल्याचे पत्नीने सांगितले. यावरुन आठ दिवसांपूर्वी समजावून सांगितले होते. मात्र याचा राग मनात होताच. सोमवारी दुपारी दीड वाजता हेग्गण्णावार याने देबाजे याला तुझा होणारा त्रास कमी करण्यासाठी उतारा करावा लागणार, असे सांगून अगरबत्ती आणि लिंबू घेऊन बी.पी.एड कॉलेजचे पाठीमागे बोलावून घेतले व लिंबू उतरवण्याचा बहाण्याने देबाजेला काटेरी झुडपात नेऊन दोरीने हात-पाय बांधले. कुऱ्हाडीने देबाजेच्या गळ्यावर निर्घृण वार करून त्याचा खून केला, अशी संशयिताने कबुली दिली. या गुह्याच्या तपासकामी कर्नाटकातील संशयित आरोपी हेग्गण्णावार याच्या संपर्कातील आणखीन दोघांना कुरुंदवाड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दीड वर्षांपूर्वी शिरढोण येथील एका महिलेचा अशाच पद्धतीने गळा चिरून खून झाला होता, याचे आरोपी अद्यापही मोकाटच आहेत. देबाजे खून प्रकरणाचा छडा लावणे हे कुरुंदवाड पोलीस प्रशासनासमोर एक आवाहन होते. ते 24 तासात संपुष्टात आणले.
या खूनप्रकरणी अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, पोलीस अधीक्षक गडहिंग्लज परिविक्षा दिन, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती अन्नपूर्णा सिंग, रामेश्वर व्यंजने, महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली कुरुंदवाडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील आणि त्यांच्या पथकाने आरोपीला चिकोडी येथून 24 तासात बेड्या ठोकल्या. पोलिसांच्या या कामगिरीबाबत कुरुंदवाड पोलिसांचे कौतुक होत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









