राज्यात राजकीय उलथापालथींची मालिका सुरू असताना अनेक रहस्यभेद होत आहेत़ दोन पक्षांच्या नेत्यांमध्ये झालेल्या चर्चा आता अनेक स्तरातून बाहेर पडत आहेत़ काहीवेळा तर पक्षांतर्गत वादाचे किस्से आता सांगितले जात आहेत़ प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करण्यासाठी पावले टाकली जातात़ राज्यात असे सगळे असताना त्यातून कोकण मागे राहिल तरंच नवल़
गेल्या आठवडय़ात शिवसेनेचे दिग्गज नेते रामदास कदम यांनी पक्षाचा राजीनामा दिल़ा त्यापाठोपाठ त्यांची हकालपट्टी पेल्याचे शिवसेनेने जाहीर केल़े यासोबतच माजी खासदार व शिवसेना नेते अनंत गीते यांनी बंडखोरी करणाऱया आमदारांवर टीकेची झोड उठवल़ी पाठोपाठ आमदार उदय सामंत यांना गीते यांनी जोरदार प्रत्युत्तर दिल़े राजकीय रणधुमाळी जोरदारपणे पुढे आल़ी
राज्याचे मंत्रीपद त्याचबरोबर विरोधीपक्षनेते पद भुषविलेले रामदास कदम हे एकेकाळचे बिनीचे शिलेदार शिवसेना नेतृत्वाची मोठी भिस्त त्यांच्यावर होत़ी त्यांनी गाडीवरचा ड्रायव्हर म्हणून कामाला सुरूवात केली असून राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवल्यानंतर त्यांची प्रगती झाल़ी मनोहर जोशी हे राज्याचे मुख्यमंत्री असताना
त्यांना राज्यमंत्री करण्यात आले होत़े पुढे फडणवीस सरकारमध्ये ते पॅबिनेट मंत्री म्हणून कार्यरत होत़े रामदास कदम यांनी खेड तालुक्यात निर्माण केलेला प्रभाव दीर्घकाळ कायम राखला आह़े अडीच वर्षापूर्वी त्यांचा मुलगा योगेश कदम राजकीय क्षेत्रात पुढे आला. योगेश यांना विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून उमेदवारी मिळाल़ी दापोली मतदार संघातून त्यांना विजय मिळाल़ा अशाप्रकारे कदम यांची पुढची पिढी देखील राजकीय क्षेत्रात स्थिरावू लागल़ी
रामदास कदम यांचा केवळ खेड, दापोली किंवा मंडणगड तालुक्यांपुरता प्रभाव मर्यादित नव्हता तर मुंबईतील मोठे क्षेत्र त्यांच्या प्रभावाखाली होत़े याची जाण सेना नेतृत्वाला चांगल्यापैकी होत़ी महापालिका निवडणुकीस अन्य निवडणुकीमध्ये कदम यांचा प्रभाव शिवसेनेसाठी मुंबईत उपयोगी पडत होत़ा पुढे माजी मंत्री अनिल परब आणि रामदास कदम यांच्यामध्ये वितुष्ट तयार झाल़े शीतयुद्धाने मोठा जोर पकडल़ा लोकांसमोर येऊन एकमेकांच्या विरोधात विधाने झाली नाहीत तरी राजकीय खेळी मात्र एकमेकांच्या विरोधात सुरू असल्याचे जाणकारांना जाणवत होत़े रामदास कदम यांच्यासाठी पक्ष संघटनेतून मिळणारी वागणूक अडचणींची वाटत होत़ी पुढे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांचा संपर्क तुटल़ा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उठाव करून उलथापालथ घडवल़ी त्यानंतर रामदास कदम यांनीदेखील शिवसेना नेतृत्वाच्या विरोधात आपल्या कठोर भावना व्यक्त केल्य़ा शिंदे यांच्या उठावामुळे शिवसेना वाचल्याची भूमिका त्यांनी घेतल़ी शिवसेनेत केलेले काम आणि सध्या मिळणारी वागणूक यामुळे कदम हे कमालिचे दुखावल़े पत्रकारांशी बोलताना त्यांना अश्रु अनावर झाल्याचे लोकांनी पाहिल़े शिवसेना पक्ष संघटना वादातून बाहेर यायला हव़ी त्यासाठी आवश्यक ती काही पावले टाकायला लागली तर ती आपण जरुर टाकू, असे कदम यांनी म्हटल़े प्रसंगी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात समन्वय घडवून आणण्यासाठी योगदान देण्याची वेळ आली तर आपण मागे राहणार नाही, असेही त्यांनी सांगितल़े
यानंतर रत्नागिरीत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उदय बने यांच्या 60 वर्षाच्या वाढदिवसानिमित्त जंगी कार्यक्रम घेण्यात आल़ा हा कार्यक्रम राजकीय नाही, असे सुरूवातीला सांगण्यात आले. कार्यक्रमाला शिवसेना नेते अनंत गीते उपस्थित होत़े आपले सारे भाषण राजकीय लयीमध्ये पूर्ण केल़े त्यामुळे कार्यक्रमाचा बाज अराजकीय न राहता तो पूर्णपणे राजकीय झाल़ा बंडात सामिल झालेले रत्नागिरी-सिंधुदुर्गातील आमदार निवडणुकीत पुन्हा विजयी होऊ नयेत म्हणून शिवसेना सगळे बळ एकवटेल, असे म्हणत त्यांनी बंडखोरांवर टीका केल़ी माजी मंत्री अनंत गीते हे तसे सौम्य प्रकृतीचे राजकारणी पण त्यांनी आपल्याला झेपेल तेवढय़ा प्रमाणात टीका करण्याचे काम पार पाडल़े
अनंत गीते यांच्या टीकेनंतर माजी मंत्री आणि रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी गीते यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिल़े ते म्हणाले, महाविकासातील घटकपक्ष शिवसेनेला संपवत आह़े, अशी टीका अनंत गीते यांनीच सुरूवातीला केली होत़ी हे सांगणारे गीतेच पहिल़े राष्ट्रवादीवर आसुड ओढणाऱया अनंत गीते यांनी माजी मुख्यमंत्री शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होत़ी सहा महिन्यांपूर्वी गीतेंनी जोरदार भूमिका घेतली होत़ी ही भूमिका का मांडली गेली, त्याचे प्रामाणिपणे गीते यांनी उत्तर द्यावे, असे सामंत म्हणाल़े
उदय सामंत हे चौथ्यांदा निवडून आलेले आमदार आहेत़ त्यांनी सुरूवातीला राज्यमंत्री नंतर पॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहिले आह़े राज्यातील उलथापालथीनंतर एकूण राजकीय परिस्थिती बदलल़ी सुरूवातीला त्यांनी कोणावरही टीका न करता राजकीय वाटचाल सुरू करण्याचे संकेत †िदल़े परंतु शिवसेना सचिव, खासदार विनायक राऊत आणि शिवसेना नेते अनंत गीते यांनी टीकेचा सुर लावल्यानंतर सामंत यांनी अत्यंत संयमाने परंतु तेवढय़ाच जोरदारपणे त्याला उत्तरे दिली आहेत़ कार्यकर्त्यांच्या भेटी-गाठीबरोबरच सामान्य लोकांमध्ये मिसळून आताची परिस्थिती समजावून सांगण्याचे काम सामंत हे करत आहेत़
एखाद्या पक्षात उठाव झाला म्हणा किंवा बंडखोरी झाली म्हणा तर चर्चेचे केंद्र तो पक्ष शिवसेना हा गेल्या 25 वर्षापासून कोकणात मजबूत असलेला पक्ष आह़े या पक्षात वेगवेगळे विचार घेऊन नेते पुढे होत असल्याने कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत़ काहींनी तर यासंदर्भात निराशा व्यक्त केल़ी अजून राजकीय लढाई मोठय़ा टप्प्यात जाणार आह़े बंड केलेल्या लोकांना सत्तापदे मिळतील त्याच्या आधारे हे बंडखोर अधिक प्रभावी ठरतील़ प्रभावी लोकांना रोखणे हे शिवसेनेसमोरचे मोठे आव्हान ठरेल़ कोणता शिलेदार कोणत्या दिशेला हे अद्याप ठरलेले नाह़ी शिवसेनेने आवाहन केले आहे की, प्रतिज्ञापत्र घेऊन आपली पक्ष संघटनेसोबतची बांधिलकी स्पष्ट कराव़ी रत्नागिरीत अनेक लोकांनी असे प्रतिज्ञापत्र तयार केल़े त्यात काही माजी नगरसेवकांचा समावेश आह़े
प्रतिज्ञापत्र तयार करणारे अनेक लोक सकाळी शिवसेना कार्यालयात आपले दस्तऐवज सादर करतात आणि संध्याकाळी बंडखोर नेत्यांकडे चहापानासाठी उपस्थित राहतात, असे चित्र दिसून येत आह़े कोणावर विश्वासावे असा नेतृत्वासमोर प्रश्न आह़े
सुकांत चक्रदेव








