शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे आयोजन : विविध संघटनांनी केले अभिवादन : ध्येयमंत्राने कार्यक्रमाची सांगता
बेळगाव : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगावच्यावतीने फाल्गुन वद्य तृतीया शके 1944 या हिंदू तिथीनुसार शुक्रवारी शिवजयंती मोठ्या थाटात साजरी करण्यात आली. जिल्हा प्रमुख किरण गावडे व शहर कार्यवाह विश्वनाथ पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. शिवाजी उद्यान येथील शिवमूर्तीला दुग्धाभिषेक, जलाभिषेक घालून जिरेटोप चढविण्यात आला. प्रारंभी प्रेरणामंत्र म्हणून कार्यक्रमाची सुरुवात झाली. महिलांच्यावतीने शिवरायांचा पाळणा म्हणण्यात आला. यावेळी किरण गावडे म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. उभे आयुष्य परकीय सत्तांना धूळ चारली आणि हे हिंदवी स्वराज्य उभे केले. या राजांची जयंती हिंदू तिथीनुसारच झाली पाहिजे. मागील 20 दिवसांपासून बलिदानमास पाळला जात असून, 21 रोजी धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त मूक पदयात्रा काढून ज्वाला शांत केली जाईल’, असे त्यांनी सांगितले. ध्येयमंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली. छत्रे गुरूजी व रवी जोशी यांनी पौरोहित्य केले. यावेळी तालुका प्रमुख परशराम कोकितकर, पुंडलिक चव्हाण, अनंत चौगुले, किरण बडवाण्णाचे, चंदू चौगुले, भास्कर पाटील, अंकुश केसरकर, गजानन निलजकर, प्रमोद चौगुले, शिवाजी मंडोळकर, रवी साळुंखे, सुधा भातकांडे, प्रमिला पाटील, वैशाली भातकांडे, वैशाली हुलजी, वर्षा आजरेकर, गीता हलगेकर, रेणू मुतगेकर, प्रिया माळवी यासह शिवभक्त उपस्थित होते.
बापटगल्ली
कालिकादेवी युवक मंडळ बापटगल्ली यांच्यावतीने शुक्रवारी शिवजयंती साजरी करण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांच्या हस्ते शिवमूर्तीचे पूजन करण्यात आले. महिलांच्यावतीने पाळणा म्हणून शिवरायांची आरती म्हणण्यात आली. यावेळी सुनील केसरकर, सुनील मुरकुटे, महेश पावले, परशराम काकतकर, भाऊ किल्लेकर, गजानन निलजकर, अमोल केसरकर, अभिषेक निलजकर यासह इतर उपस्थित होते.
शिवसेनेच्यावतीने शिवजयंती
शिवसेना सीमाभाग (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यावतीने शुक्रवारी शिवाजी उद्यान येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. उप जिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर व तालुकाप्रमुख सचिन गोरल यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी उपशहरप्रमुख राजू तुडयेकर, प्रकाश राऊत, प्रदीप सुतार, विनायक हुलजी, चेतन शिरोळकर, प्रभाकर देसाई, रघुनाथ चव्हाण यासह शिवसैनिक उपस्थित होते.









