पंचांगकर्ते मोहन दाते यांचे गणेशभक्तांना आवाहन
सोलापूर ; धर्मशास्त्रातील निर्णयाप्रमाणे 19 सप्टेंबरलाच अंगारक योग असल्याने याच दिवशी श़्री गणेश प्रतिष्ठापना करणे योग्य असल्याचे आवाहन सोलापुरातील प्रसिद्ध दाते पंचांगकर्ते मोहन दाते यांनी केले आहे. वेगवेगळ्dया पंचांगकर्त्यांची दिनदर्शिका तयार करण्याची पद्धत व सूत्रे वेगवेगळी असतात. यामुळे काही सणवारांमध्ये वेळेचा किरकोळ फरक असू शकतो. याच गोष्टीचा फायदा उचलत काही व्यक्ती समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहनही सोलापुरातील प्रसिद्ध पंचांगकर्ते मोहन दाते यांनी केले आहे. धर्मसिंधू या ग्रंथात गणेश चतुर्थी केव्हा करावी, याबाबत स्पष्टपणे निर्णयाद्वारे सांगितले आहे. दि. 18 सप्टेंबर रोजी 12.40 वा. तृतीया समाप्ती होऊन दुसऱ्या दिवशी दुपारी 1.45 वा. चतुर्थी समाप्ती आहे. त्यामुळेच 19 सप्टेंबर रोजी येणारी चतुर्थी मंगळवारी व संपूर्णपणे मध्यान्हव्यापीनी असल्यानेच पंचांगात दिलेल्या तारखेप्रमाणे या दिवशीच गणेश स्थापना करणे योग्य राहणार असल्याचे दाते यांनी सांगितले.
डोंबिवली येथील धर्मसभेत पूज्य शंकराचार्य शृंगेरीमठ व पु. गणेश्वरशास्त्राr द्रविड मठ यांनी वेगवेगळ्dया धर्मगुरुंनी आपण वापरत असलेल्या पंचांगाचाच नेहमी वापर करण्याचे सांगितले आहे. पंचांगकर्त्यांमध्ये असलेल्या भिन्न मत-मतांतरांकडे दुर्लक्ष करण्याचे देखील त्यांनी आवाहन केले आहे. त्यामुळे अगदी अचूक गणितीय पद्धत व धर्मशास्त्रातील दिलेल्या निर्णयानुसार तयार केलेल्या दाते पंचांगाचाच वापर श्री गणेशाची स्थापना करण्यासाठी करावा, असे आवाहन पंचांगकर्ते मोहन दाते यांनी केले आहे. महाराष्ट्रासह इतर आठ राज्यांमध्ये देखील दाते पंचांगाचाच वापर करून धर्मशास्त्र निर्णयानुसारच गणेश स्थापना करण्यात येत असल्याची माहिती दाते यांनी यावेळी दिली. पंचांगातील मतमतांतरे भिन्नता लक्षात न घेता धर्मसिंधू ग्रंथात गणेश चतुर्थीबाबत 19 सप्टेंबर रोजी असणाऱ्या अंगारक योगावरच गणेश स्थापना करण्याचे आवाहन दाते यांनी सर्व जनतेला केले आहे.









