प्रतिनिधी खानापूर
खानापूर घाटमाथ्यावर रेणावीपासून नागजपर्यंत बऱ्याच ठिकाणी काम अपूर्ण ठेवून ठेकेदाराने बोजाबिस्तरा गुंडाळला आहे. या अपूर्ण कामाच्या ठिकाणी दररोज अपघात होत आहेत. गुरुवारी रात्री केमिकल सिमेंट वाहतूक करणाऱ्या टँकरचा मोठा अपघात होऊन टँकरचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी टळली आहे.
मात्र राहिलेल्या अपूर्ण कामाच्या ठिकाणी होणाऱ्या अपघातांना जबाबदार कोण असा प्रश्न विचारला जात आहे. खानापूर तालुक्यातील हिवरे येथील यलम्मा देवी मंदिराच्या बाजूच्या पुलाचे काम अर्धवट सोडल्याने याठिकाणी दररोज अपघातांची मालिका होत आहे. खासदारांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या मार्गाचे उद्घाटन केले मात्र, राहिलेले काम तसेच राहिले. राहिलेले काम धोकादायक बनले असून आजपर्यंत सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र वाहनांच्या होणाऱ्या नुकसानीची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








