नाणीज येथे ट्रक-कारचा भीषण अपघात; पाचजण जखमी, वऱ्हाडी शोकसागरात
रत्नागिरी प्रतिनिधी
कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर नाणीज येथे ट्रक-कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात वृद्धेचा मृत्यू झाला असून अन्य 5 जण जखमी झाले आहेत. ही घटना शुकवारी दुपारी 2 च्या सुमारास घडल़ी सुवर्णा शिवराम नागवेकर (75, वाडावेसराड त़ा संगमेश्वर) असे मृत महिलेचे नाव आह़े सुवर्णा या नातीच्या लग्नासाठी त्या कारने रत्नागिरी येथे येत होत्य़ा.
सुनील यशवंत पेडणेकर, सुष्मा सुनील पेडणेकर, हर्षदा हरिश्चंद्र वारंग, हरिश्चंद्र वासुदेव वारंग व विकांत हरिश्चंद्र वारंग (सर्व रा. साखरपा-रत्नागिरी) अशी अपघातातील जखमींची नावे आहेत़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातात मृत सुवर्णा व अन्य जखमी 2 डिसेंबर रोजी दुपारी साखरपा येथून कारने (एमएच 01 डीपी 2658) विवाह सोहळ्dयासाठी रत्नागिरी येथे येत होत्य़ा ही कार विकांत वारंग हा चालवत होता.
यावेळी नाणीज येथे विरुध्द दिशेने येणाऱया ट्रकने (एमएच 09 सीए 3124) कारला जोराची धडक दिल़ी या धडकेत कार रस्त्याकडेच्या झुडपात फेकली गेल़ी यात कारमधील 6 जणांना दुखापत झाल़ी त्यांना जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आल़े यावेळी सुवर्णा यांना वैद्यकीय अधिकाऱयांनी तपासून मृत घोषित केल़े अन्य 5 जणांवर उपचार करण्यात येत आहेत़ जखमींना वैद्यकीय अधिकारी जिन्या लाखाटे, केतन पाटील, तुषार पुंभार, मंदार कांबळे, मुग्धा फडके, संदेश केळकर व पवीण इप्पर यांनी तातडीची वैद्यकीय सेवा दिल़ी या अपघाताची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरु आह़े