प्रतिनिधी/कारवार: स्वातंत्रोत्सव साजरा करण्यासाठी शाळेकडे निघालेल्या शिक्षकाचा अपघाती मृत्यु झाल्याची घटना मंगळवारी सकाळी कुमठा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. गोपाल पटगार ( वय ५०) असे मृत शिक्षकाचे नाव आहे. या घटने बद्दल समजलेली अधिक माहिती अशी, कुमठा तालुक्यातील हेगडे येथील रहिवासी गोपाल पटगार, गुड्डेयंगडी येथील शाळेत सेवा बजावित होते. काल मंगळवारी स्वातंत्रोत्सव सहभागी होण्यासाठी ते हेगडे येथून गुड्डेयंगडी येथे मोटर सायकल वरून निघाले असता बोलेरोने जोराची धडक दिल्याने ते जागीच ठार झाले. कुमठा पोलिस अधिक तपास करत आहेत.
Previous Articleऐतिहासिक काळातील बांधकामाप्रमाणे शिवतीर्थचे काम करा ! पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या सुचना
Next Article मळगाव रेल्वे स्थानकावर अपघात । राष्ट्रवादी आक्रमक









