सागर नाणोसकर यांचा सवाल
दोडामार्ग हेवाळे बांबर्डे राज्यमार्गावर सावंतवाडी आगाराच्या २ बसेस मध्ये अपघात झाला होता . बसच्या अपघातात खरोखरच चालकाची चूक आहे की बसेस नादुरुस्त आहे हे अजून सिद्ध झालेले नाही . त्यामुळे जोपर्यंत झालेल्या अपघातग्रस्त बसचा आर . टी. ओ कडून बस रस्ता वाहतुकीसाठी योग्य असल्याचा अहवाल येत नाही तोपर्यंत दोन्ही बसच्या चालकांवर कुठलीही प्रशासकीय कारवाई करण्यात येऊ नये . तसेच त्यांना ट्रेनिंगच्या नावाखाली शिक्षा देऊन त्यांचे मानसिक खच्चीकरण करू नये . संबंधित चालकांवर कोणतीही चुकीची कारवाई झाल्यास होणाऱ्या परिणामास बसच्या अपघाताचा पंचनामा करणारा अहवालकर्ता जबाबदार असेल असा इशारा युवासेना उपजिल्हाधिकारी सागर नाणोसकर यांनी सावंतवाडी आगाराला दिला आहे . त्यांनी आज सावंतवाडी आगार व्यवस्थापकांना निवेदन दिले .
दरम्यान , परवा दोडामार्ग येथे ज्या बसचा अपघात झाला होता . तीच बस काल आणि आज प्रवासी वाहतुकीसाठी वापरण्यात आली . त्यामुळे जर पुन्हा अशी दुर्घटना घडून जीवितहानी झाली तर त्यात जबाबदार कोणाला धरायचे असा सवालही त्यांनी विचाराला आहे .









