राष्ट्रीय महामार्गावर घुणकी फाट्याजवळ रस्त्याकडेने चाललेल्या रोडरोलरला आर्टिगा गाडीने पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन जण ठार तर चारजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.राहुल अशोक शिखरे(वय ३० रा.मिणचे) व सुयोग दत्तात्रय पवार (वय २८ रा.टोप) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत.
अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार टोप शिये व मिणचे येथील युवक प्रदर्शन बघण्यासाठी मुंबई येथे गेले होते, प्रदर्शन पाहून रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान ते मुंबई येथील आर्टिगा गाडी( क्र.एम एच ४८ ए के ६५४५) ने घरी परतण्यासाठी निघाले, त्यांच्यासोबत आणखी एक गाडी होती,पहाटे साडेसहाच्या दरम्यान घुणकी फाट्याजवळ किणी टोल नाक्याच्या दिशेने चाललेल्या रोड रोलरला आर्टिगाने जोराची धडक दिली धडक एवढी जोरदार होती की धडकेने रोडरोलर साईड रस्त्यावर पलटी झाला तर गाडीचा पुढचा भाग चक्काचूर होऊन तिचे तोंड पुण्याच्या दिशेला झाले, धडक होताच महामार्गावरील वाहतूक जागीच ठप्प झाली, अपघात होताचआजूबाजूच्या शेतकऱ्यांनी तसेच महामार्गावरील प्रवाशानी ब परिसरातील शेतकऱ्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले, अपघातग्रस्तांचे बचावासाठी ओरडणे अंगावर शहारे आणणारे होते,अपघातात गंभीर जखमी झालेल्या सुयोग पाटील(वय २८) ,सुनील कुरणे(वय २४) वैभव चौगुले(वय २३ सर्व रा.टोप) अनिकेत जाधव(वय २२) निखिल शिखरे(वय २७) व राहुल शिखरे(वय ३० सर्व रा .मिणचे) या सर्व जखमींना तातडीने नाणीज मठाच्या रुग्णवाहिकेतून गंभीर जखमी अवस्थेत कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले,रोलर चालक दादासो दबडे (वय ४० रा वाठार) यांनाही उपचारासाठी हायवे पेट्रोलिंगच्या रुग्णवाहिकेतून उपचारासाठी दाखल करण्यात आले , शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्यापैकी सुयोग पवार व राहुल शिखरे यांचे उपचारापूर्वीच निधन झाल्याचे घोषित करण्यात आले.
Previous Articleबेटणे-कणकुंबी-चोर्ला रस्ता दुरुस्तीला प्रारंभ
Next Article भावी शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण









