प्रतिनिधी: रायगड
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर खोपोलीजवळ कंटेनर ने मुंबईकडील लेन सोडून पुणे बाजूकडील लेन वर आल्याने पलटी झाला आणि भीषण अपघात घडला. या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला असुन चार जण जखमी झाले आहेत.
आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास कंटेनर(MH-46-AR-0181) पुण्याकडून मुंबईकडे जात असताना किलोमीटर ३५ जवळ सदर कंटेनर ने मुंबईकडील लेन सोडून पुणे बाजूकडील लेन वर येऊन पलटी झाला. सदर अपघातात एकूण ५ छोटी वाहने बाधित झाली असून सुझुकी डिझायर कार (MH-48-A-6512) या कारमधील चालक व एक महिला असे दोघेजण जागीच मयत झालेले आहेत. सदर कार मधील दोन जखमी महिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच, इतर कार मधील दोन महिला जखमी असून त्यांना देखील एमजीएम रुग्णालय कामोठे येथील दाखल केले आहे.
मुंबईकडे जाणाऱ्या लेन वरून वाहतूक सुरळीत सुरू आहे. पुणे दिशेकडे जाणारी वाहतूक संथ गतीने असून अपघात झालेली वाहने बाजूला काढताना काही वेळासाठी वाहतूक थांबवण्यात आलेली होती. आता यावेळी वाहतूक सुरळीत करण्यात येत आहे.