Kokan Accident News : गोवा -मुंबई हायवेवर गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत मौजे रेपोली येथे दोन वाहनांची समोरासमोर धडक झाल्याने मोठा अपघात झाला. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 5 पुरुष, 3 महिला आणि एका लहान मुलीचा समावेश आहे. रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात असलेल्या रेपोली गावाजवळ हा भीषण अपघात झाला.लोटे एमआयडीसी येथून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रक आणि मुंबईकडून गुहागर कडे जाणाऱ्या कारची समोरासमोर धडक झाल्याने वाहनांचा चुराडा झाला आहे. यामध्ये 4 वर्षांचा मुलगा बचावला असल्याची माहिती रायगड पोलिसांनी दिली आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की,
माणगाव तालुक्यातील गोरेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत रेपोली गावाजवळ आज (गुरुवार,१९ जानेवारी) रोजी पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला.इको कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली.यात इको कारच्या समोरील भागाचा अक्षरशः चुराडा झाला.ट्रक लोटे परशुराम औद्योगिक वसाहती मधून मुंबईकडे जात होता तर मुंबईहून गुहागर कडे जाणारी कार जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.मृत्यूचा सापळा बनत चाललेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे बांधकाम मागील कित्येक वर्षांपासून संथ गतीने सुरु आहे. -तसेच सातत्याने या रस्त्यावर अपघात होत असून अद्यापही शासन प्रशासनाला जाग आलेली नाही,त्यामुळे अजून किती नागरिकांचे बळी गेल्यावर सरकार जागे होणार, असा सवाल सामान्य नागरिक करत आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









