ओटवणे प्रतिनीधी
बांदा – दाणोली जिल्हा मार्गावर पुन्हा एकदा आयशर टेम्पोचा अपघात झाला. वाफोली येथे हाँटेल डोंगरीकर नजिक वळणाचा अंदाज न आल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटून आयशर टेम्पो रस्त्याच्या कडेला अपघात ग्रस्त झाला. सुदैवाने तो पलटी झाला नाही. त्यामुळे सुदैवाने जिवित हानी झाली नाही.सुदैवाने या अपघातात चालकाला गंभीर दुखापत झाली नाही, मात्र गाडीच्या दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. चालक गोव्याहून बांदा – दाणोली मार्गे कोल्हापूरला जात होता. यावेळी भरधाव वेगात समोरील वळणाचा अंदाज न आल्याने कँटर आयचर वाफोली येथील डोंगरीकर हाँटेलच्या ‘ त्या ‘ धोकादायक वळणावर अपघातग्रस्त झाला .चालकाला किरकोळ दुखापत झाली. या वळणावर अपघाताची मालिका सुरूच असून आठवड्यातून एक दोन अपघात ठरलेलेच आहेत. त्यामुळे दोन महिन्यांपूर्वी संबंधित यंत्रणेने सूचना फलक लावूनही त्याकडे वाहन चालक दुर्लक्ष करत असून बेजबाबदारपणे वाहने हाकत आहेत. या बेजबाबदार पणे वाहन हाकणाऱ्या वाहन चालकांना पोलीस प्रशासनाने आवर घालावा असे आवाहन या मार्गावरील ग्रामस्थांसह पादचाऱ्यांमधून होत आहे.या धोकादायक वळणाच्या अलीकडे दोन महिन्यापूर्वी गतिरोधक बसाविण्यात आला. मात्र फायबरचा हा गतिरोधक महिन्या भरातच तुटून पडला. त्यामुळे या ठिकाणी कायमस्वरूपी टिकावू गतिरोधक गरजेचा आहे.
Previous Articleपावसाने उडविली दाणादाण
Next Article खेळ जुनाच ओळख नवी ! ‘क्लासिकल चेस’









