Ratnagiri News : माशांच्या पाण्यावरून घसरून दुचाकी अपघातातांची मालिका घडल्याचे वृत्त दैनिक तरुण भारतमध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. या वृत्ताची दाखल घेऊन सजग नागरिकांनी भर रस्त्यात मच्छी वाहतूक करताना वाहनातील पाणी रस्त्यावर सोडणाऱ्या वाहनधारकाची चांगलीच खरडपट्टी काढली.रस्त्यावर मासे वाहतूक करणाऱ्या गाडीच्या सांडलेल्या पाण्यावरून सुमारे १० ते १२ वाहने घसरून अपघात घडल्याची घटना रविवारी सायंकाळी ७ वा.च्या सुमारास घडली होती.
रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर साळवी स्टाॅप येथे भंगार व्यावसायिकांच्या समोर हा अपघात घडला.रस्त्यावर सांडलेल्या पाण्यावरून ५ ते १० मिनिटांच्या कालावधीत धडाधड दुचाकी पडण्याच्या प्रकार झाला होता.या अपघातांच्या मालिकांमुळे अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे.त्याच बरोबर अनेकजण जखमी झाले.सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
या मार्गावर नियमित मासे वाहतूक होत असते.या मासे वाहतुकीमुळे रस्त्यावर पाणी सांडण्याचे प्रकार नियमित होतात.त्यामुळे असे अपघात घडत असतात.अशाच प्रकारे रस्त्यात पाणी सोडणाऱ्या वाहन चालकाला दक्ष नागरिकांनी रस्त्यात अडवून घडल्या प्रकाराची विचारणा केली आहे. संबंधित यंत्रणा या बाबतीत नेहमीच उदासीन दिसून आली आहे. अपघातांच्या या प्रकारामुळे संबंधित यंत्रणेने या प्रकरणी कायमची उपाय योजना करून वाहन धारकांना सुरक्षा पुरवावी अशी मागणी होत आहे.
Previous ArticleACB च्या जाळ्यात सापडलेले वादग्रस्त शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना 3 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी
Next Article थंडीच्या दिवसात बनवा चविष्ट आणि पौष्टिक मटार पराठा









