कुंभोज वार्ताहर
कुंभोज तालुका हातकणंगले येथील कुंभोज बाहुबली रोडवर असणाऱ्या रामलिंग मंदिरा शेजारी कुंभोजहून बाहुबलीकडे जाणाऱ्या इनोव्हा गाडी व टू व्हीलर गाडीचा अपघात झाला. यामध्ये टू व्हीलर चालक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जयसिंगपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
फोर व्हीलर चालक हर्षवर्धन जाधव हा हरिपूर येथील आहे. सदर अपघातात टू व्हीलर चालक नितीन धनवडे व जोडीदार (पारगाव) गंभीर जखमी झाले आहेत. हे दोघे ते घरगुती कामासाठी कुंभोज येथे आले होते. यावेळी अपघात झाला. परिसरात असणाऱ्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास घेण्याचे काम सुरू आहे. घटनास्थळी कुंभोजसह परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.









