बेळगाव तालुक्यातील होनगाजवळील बेन्नाळी ब्रिज राष्ट्रीय महामार्गावर कॅन्टर, कार आणि मालवाहूमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोघे जण जागीच ठार झाले असून शिवापूर श्री मुप्पीन काडसिद्वेश्वरमठाचे स्वामीजी गंभीर जखमी झाले आहेत.
महामार्गावर कॅन्टरचा वेग अचानक कमी झाल्याने त्याच्या माघून येणारी कार कॅन्टरला धडकली. याचवेळी पाठीमागून येणारी मालवाहू ट्रक कारला धडकला. दरम्यान या घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला तर, श्री मुप्पीन काडसिद्वेश्वरमठाचे स्वामीजी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळताच पीआय सीन्नूर, काकती पीएसआय मंजुनाथ हुलकुंद व कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन पाहणी केली.









