ऑनलाईन टीम / तरुण भारत :
सिंदखेडराजाजवळ एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 13 प्रवाशी जखमी आहेत. जखमींवर सिंदखेडराजा ग्रामीण रुग्णाल्यात उपचार सुरू आहेत. नागपूर-पुणे महामार्गावरील पळसखेड चकमत या गावानजिक आज सकाळी 6.25 च्या सुमारास हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस आज सकाळी संभाजीनगरहून वाशिमच्या दिशेने जात होती. सकाळी 6.15 च्या सुमारास नागपूर-पुणे महामार्गावरील पळसखेड चकमत या गावानजिक समोरुन येणाऱ्या ट्रकने एसटीला जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की, अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 13 जण जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदत आणि बचावकार्य राबविले. काही मिनिटांतच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर जखमींना सिंदखेडराजा ग्रामीण रुग्णाल्यात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 5 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.








