ग्रेटर नोएडा
उत्तरप्रदेशच्या ग्रेटर नोएडामध्ये शुक्रवारी मोठी दुर्घटना घडली आहे. येथील आम्रपाली समुहाच्या एका निर्माणाधीन इमारतीची लिफ्ट 80 फुटांच्या उंचीवरून खाली कोसळली आहे. या दुर्घटनेत 4 जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून 5 जण जखमी झाले आहेत. या जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व मृत हे मजूर असून ते निर्माणाधीन इमारतीत काम करत होते









