वार्ताहर/ आंबोली
कारिवडे पेडवेवाडी येथील स्वामी समर्थ धाब्याच्या वळणावर इनोव्हा कार आणि एसटी बस यांच्यात अपघात होऊन इनोव्हा कार मधील प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत . यात इनोव्हा कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून एसटी बसचे ही नुकसान झाले आहे. इनोव्हा कारच्या एअर बॅग ओपन झाल्याने चालकाला आणि आतील प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. हा अपघात साधारण पावणे बारा वाजण्याच्या सुमारास घडला. यात एसटी बस मधील प्रवाशांना ही दुखापत न झाल्याने दोघांनीही हे प्रकरण एकमेकात तडजोड करून मिटविले आहे. त्यामुळे पोलीसांत यांची नोंद करण्यात आली नसल्याचे समजते.
Previous Articleकोल्हापूरच्या पृथा पवार ठरल्या “मिसेस इंडिया मिडल ईस्ट 2023” च्या मानकरी; कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
Next Article जळगावात 27 जूनला ‘शासन आपल्या दारी’









