सावंतवाडी : प्रतिनिधी
खासकीलवाडा येथे ४ नंबर शाळेकडे सुमन नाईक दवाखान्याच्या बाजूला खोदलेल्या रस्त्यामुळे आज दुपारी १. ३० वाजण्याच्या सुमारास टाटा nexon कार एका बाजूने गटारात कलंडून सुमारे ३० ते ४० हजाराचे नुकसान झाले आहे . दरम्यान नळपाणी योजनेच्या पाईपलाईनसाठी हा चर खोदण्यात आला होता , आणि काही दिवसांपूर्वी तो चर बुजवावा अशी मागणी होत होती . परंतु नगरपालिकेने केलेल्या दुर्लक्षामुळे आज हा अपघात घडला असा आरोप नागरिकांमधून होतोय .









