वृत्तसंस्था/ शिमला
हिमाचल प्रदेशच्या शिमला जिल्ह्dयात रस्ते दुर्घटना झाली असून यात 6 जणांना जीव गमवावा लागला आहे. तर या दुर्घटनेत 6 जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेप्रकरणी पोलीस तपास करत असले तरीही अद्याप याच्या कारणांचा शोध लागलेला नाही. तर जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले प्रवासी हे मजूर असल्याची माहिती शिमल्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक नवदीप सिंह यांनी दिली आहे.
सुन्नी भागातील कढारघाट येथे ही दुर्घटना घडली आहे. येथे एक पिकअप वाहन दुर्घटनाग्रस्त झाले, यामुळे तीन जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर 3 जखमींनी रुग्णालयात उपचार सुरू असताना अखेरचा श्वास घेतला आहे. सुन्नीला किंगलशी जोडणाऱ्या रस्त्यावर सोमवारी सकाळी 7 वाजता ही दुर्घटना घडली आहे. पिकअप वाहनातून चालकासमवेत एकूण 12 जण कढारघाटच्या दिशेने प्रवास करत होते. कढारघाटला पोहोचण्यापूर्वी पिकअप वाहन खोल दरीत कोसळले आहे. स्थानिक लोकांनी या दुर्घटनेची माहिती पोलिसांना दिली होती. ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी बचावकार्य राबविले आहे.









