देवगड/ प्रतिनिधी
देवगड दाभोळे येथील डॉ. पाटणकर यांच्या हॉस्पिटलसमोर एका अवघड वळणावर एसटीची मोटारसायकलला धडक बसून झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार विश्वनाथ हरी कोंडूसकर (55, रा. इळये पाटथर) हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर देवगड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा अपघात बुधवारी सकाळी 10.30 वा. च्या सुमारास घडला. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर देवगड पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजन जाधव, कॉन्स्टेबल निलेश पाटील यांच्यासह देवगड एसटी प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, या अपघातामुळे दोन्ही बाजूची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









