न्हावेली /वार्ताहर
न्हावेली तिठा येथे एसटी आणि बोलोरो यांच्यात टक्कर होऊन झालेल्या अपघातात गाडीचे नुकसान झाले.आज दुपारी साडेबारा वाजता सावंतवाडी वरून आरोंदा येथे जाणाऱ्या एसटी बसला आरोसमधून सावंतवाडीच्या दिशेने जाणाऱ्या बोलोरो गाडीचा आरोस तिठा येथे अपघात झाला. या अपघातात एसटी बस मधील प्रवासी सुदैवाने जखमी झाले नाही. तर दोन्ही गाड्यांचे किरकोळ नुकसान झाले आहे. या अपघातामुळे सावंतवाडी आरोस मार्गे आरोंदा मार्गावरील वाहतूक खोळंबल्यामुळे काही तास प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागले.









