हेलिकॉप्टरच्या पंखाच्या तावडीत सापडल्याने मृत्यू
वृत्तसंस्था / रुद्रप्रयाग
केदारनाथ यात्रा सुरू होण्यापूर्वी उत्तराखंडमध्ये दुर्घटना घडली आहे. रविवारी दुपारी हेलिकॉप्टरच्या पंखाच्या तावडीत सापडल्याने एका युवकाचा मृत्यू झाला आहे. मृताचे नाव अमित सैनी असून तो उत्तराखंड सिव्हिल एव्हिएशनमध्ये कार्यरत होता. हेलिकॉप्टरच्या लँडिंगदरम्यान अमित सैनी हेलिकॉप्टरनजकी जात होता, तेव्हा तो टेल रोटरच्या तावडीत सापडून त्याचे शीर धडावेगळे झाले. हेलिपॅडवर दुर्घटनेवेळी उत्तराखंड सिव्हिल एव्हिएशनचे सीईओ उपस्थित हेते. निरीक्षणादरम्यान ही दुर्घटना घडली आहे. केदारनाथ यात्रा 25 एप्रिलपासून सुरू होणार आहे. केदारनाथ यात्रेकरता प्रशासकीय स्तरावर तयारींना वेग दिला जात आहे. तसेच मंदिर समिती देखील केदारनाथ मंदिर सजविण्याचे काम करत आहे. भाविकांच्या सुविधेसाठी हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्यात आली आहे. केदारनाथ धामसाठी डीजीसीएने यावेळी 9 हेलिकॉप्टर सेवांना अनुमती दिली आहे. गुप्तकाशी, फाटा आणि शेरसी येथून हेलिकॉप्टर उड्डाण करणार आहे.









