वार्ताहर /शिवोली
शिवोली-मार्ना ते गणेशपूरी-म्हापसा या मार्गावरील धोकादायक वळणावर अपघात होऊन एकजण जखमी झाल्याची घटना घडली आहे. सदर घटना रविवार दि. 30 रोजी संध्याकाळी 4.45 वा. घडली. या घटनेसंदर्भात अधिक माहिती अशी की, बिगर गोमंतकीय राजवीर सिंह हे आपल्या मुलीसह म्हापसा येथे काही कामानिमित्त आले होते. आपले काम उरकून अॅक्टीव्हा क्र. जीए-03-एके-6643 या दुचाकीवऊन गणेशपूरी-म्हापसा ते मार्ना-शिवोली या मार्गाने हरमल येथे जात होते. त्यासाठी त्यांनी मार्ना-शिवोली हा शॉर्टकट रस्ता पत्करला. शिवोली येथे असलेल्या धोकादायक वळणावर अचानक त्यांच्या समोर चारचाकी गाडी अंगावर आली. त्यांनी प्रसंगावधान साधून आपला जीव वाचविण्यासाठी एकदम कडेला घेतली त्याने त्यांच्या कंट्रोल होऊ शकली नाही व ते उतरणी असल्याने सरळ एका कुंपण मोडलेल्या घराच्या जागेत जाऊन पडले. त्यात त्यांना गंभीर दुखापत झाली. या मार्गावऊन जाणाऱ्या काही युवकांनी सदर घटना पाहली. कुंपण मोडलेल्या जागेत पडलेल्या श्री. सिंह यांना या युवकांनी उचलून बाहेर रस्त्यावर आणले व पुढील उपचारासाठी 108 ऊग्णवाहिका बोलावून पाठवून दिले.









