वार्ताहर / कुडाळ
मुंबई – गोवा महामार्गावर कुडाळ-पावशी बॉर्डर दरम्यान भंगसाळ नदी पुलानजीक महाराष्ट्र शासन कामगार मध्यान्ह भोजन घेऊन जाणारा टेम्पो चालकाला रस्त्यावरील पावसाच्या पाण्याचा अंदाज न आल्याने पलटी होऊन अपघात झाला. यात टेम्पो चालक किरकोळ जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी कुडाळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा अपघातात शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास झाला.टेम्पो चालक आपल्या ताब्यातील टेम्पो घेऊन महाराष्ट्र कामगार मध्यान्ह भोजन घेऊन कुडाळहून ओरोसच्या दिशेने जात होता. शनिवारी सकाळी पाऊसही जोरात सुरु होता. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. कुडाळ-पावशी बॉर्डरवर भंगसाळ नदी पुलानजीकमुंबई – गोवा महामार्गावर टेम्पो चालकाला रस्त्यावरील पाण्याचा अंदाज न आल्याने त्याने गाडीचा अचानक ब्रेक लावला. त्यामुळे टेम्पो स्लिप होऊन पलटी होऊन अपघात झाला. त्यावेळी रस्त्यावर अन्य वाहन नसल्याने मोठा अनर्थ टळला. यात टेम्पो चालक किरकोळ जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी कुडाळ येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
अनुजा कुडतरकर
Anuja Kudtarkar | journalist # NEWS EDITOR # scriptwriter and content producer at tarun bharat news sindhudurg