प्रतिनिधी
बांदा
मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गावरील इन्सुली कोठावळेबांध येथे रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यास कारची धडक बसली. या धडकेत पादचारी गंभीर जखमी झाला असून दीपक नारायण गवस (५०,रा.परमे, ता. दोडामार्ग) असे त्या जखमीचे नाव आहे. जखमी गवस यांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी गोवा येथे हलविले. हा अपघात सायंकाळी सातच्या सुमारास झाला.
Previous Articleपूर्वा गावडे हिला शासनाचा जिल्हा क्रीडा पुरस्कार जाहीर
Next Article एचडीएफसी, आयटीसी-टाटा मोटर्सच्या घसरणीचा फटका









