नवी दिल्ली
कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डाटा केंद्रांच्या विस्तारासह विकासासाठी आयटी क्षेत्रातील कंपनी अॅक्सेंचर आगामी काळामध्ये भारतामध्ये 3 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. पुढील तीन वर्षांच्या कालावधीमध्ये ही गुंतवणूक टप्प्याटप्प्याने कंपनीकडून केली जाणार आहे. या गुंतवणुकीचा लाभ इतर सर्व उद्योगांना आगामी काळात होऊ शकणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित प्रकल्प राबवणाऱ्या या विभागात सध्याला 80 हजार जण काम करत असून भारतात कंपनीत एकूण कर्मचाऱ्यांची संख्या सध्याला 3 लाख इतकी असल्याचीही माहिती कंपनीने दिली आहे.









