नवी दिल्ली
मंदीची शक्यता लक्षात घेऊन जगभरातील कंपन्यांनी कर्मचारी कपातीचे धोरण राबवले असून यामध्ये आता आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी अॅक्सेंचरचा सुद्धा समावेश झाला आहे. सदरच्या कंपनीकडून येत्या काळामध्ये 19 हजार कर्मचाऱ्यांची कपात केली जाणार आहे, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. त्यांच्या एकूण कर्मचारी संख्येपैकी ही घट साधारण अडीच टक्के असणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. बिघडलेल्या जागतिक आर्थिक स्थितीच्या कारणास्तव कंपनीला कर्मचारी कपातीचा निर्णय घ्यावा लागतो आहे. येणाऱ्या काळामध्ये वार्षिक महसूल आणि नफा कमी राहणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. तिसऱ्या तिमाहीमध्ये 16.1 अब्ज डॉलर्सची कमाई होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. वार्षिक महसूलाची टक्केवारी 8 ते 10 टक्के इतकी असू शकते असेही कंपनीने म्हटले आहे.









