शुक्रवारी मोजमाप करण्यासाठी प्रयत्न सुरू
बेळगाव : आरटीओची जुनी इमारत पाडविण्यात आली आहे. त्या ठिकाणी आता नवीन इमारत बांधकामाचे वेध लागले आहेत. सध्या नूतन इमारत बांधणीच्या कामाला लवकरच सुऊवात होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांना r दिली. शुक्रवारी या ठिकाणी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी इमारत बांधकामासाठी मोजमाप केले असून या ठिकाणी लवकरच नूतन इमारतीचे काम सुरू करणार असल्याचे सांगितले. नूतन इमारतीच्या कामाला कधी सुऊवात होणार याकडे अनेकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. दरम्यान, याबाबत ‘तरुण भारत’ने वृत्तांकन केले आहे. आता याची दखल घेत शुक्रवारी अधिकाऱ्यांनी इमारत बांधकामासाठी पाऊल उचलल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, कर्नाटक परिवहन महामंडळामार्फत याचे काम होणार असल्याने नूतन इमारतीचा नेमका खर्च किती येणार? याची उत्सुकताही अनेकांना लागून राहिली आहे. सध्या असलेली इमारत भुईसपाट करण्यात आली आहे. केवळ जुन्या इमारतीचे अवशेष उरले आहेत तेही त्या ठिकाणांहून हटविण्यात आले आहेत. आता नूतन इमारतीच्या बांधकामासाठी अधिकारी सरसावले असून तातडीने कामाला सुऊवात करण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे.








